संगणकाची ओळख-
Computer या Compute इंग्रजी क्रियापदापासून तयार झालेला शब्द आहे. Compute म्हणजे हिशोब करणे. मानवाच्या व्यावहारिक जीवनामध्ये हिशोब / गणितीय कामे अटळ आहे. यासाठी आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा काही गणितीय सूत्र वापरतो. यामुळे कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने हिशोब करता येतो. परंतु गुंतागुंतीची कामांसाठी जास्त वेळ लागतो आणि अचूकतेचा प्रश्न निर्माण होतो. कदाचित म्हणूनच मानवाला अशा गुंतागुंतीच्या कामांसाठी आणि त्यातील अचूकतेसाठी मशिन निर्माण करण्याची कल्पना सुचली. या संकल्पनेतून ज्या मशीनचा किंवा उपकरणांचा जन्म झाला. त्यास आपण कंप्युटर म्हणतो. मराठीत या मशीनला संगणक म्हणतात. संगणक म्हणजे गणितीय कामे करणारा. असे असले तरी हा केवळ गणितीय कामेच करू शकतो किंवा केवळ हिशोबासाठीच वापरला जातो असे नसून जगातील सर्वच क्षेत्रामध्ये संगणकाने आपला ठसा उमटविला आहे. विशेषतः संशोधनासारख्या क्षेत्रामध्ये संगणक अतिमहत्वाची भूमिका पार पडतो. आज आपण वापरतो तो संगणक पूर्वीच्या संगणकाच्या तुलनेत उपकरणांनी वेगळा वाटतो पण एकूण कामाच्या माध्यमात थोडा फरक आहे. दरम्यानच्या काळात अनेक नवनवीन आवृत्ती निर्माण होत गेल्या व पुढेही होत राहतील. नवीन आवृत्तीमागे गती, अचूकता, विश्लेषण हा उद्देश असतो.
संगणक म्हणजे काय?
संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आहे. यामध्ये प्रचंड स्मरणशक्तीचे आणि कार्यप्रणालीचे उपकरणे असून काही प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केलेला आहे. आज जगातील सर्वच संगणकशास्रज्ञ हे मशीन पूर्णपणे मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे काम कसे करेल या शोधाच्या प्रयत्नांत आहे. संगणकाची काम करण्याची सोपी पद्धत आहे. प्रथम त्याला माहिती पुरविली जाते. ज्यावर तो गणितीय व तांत्रिक पद्धतीने प्रक्रिया करतो व त्या कामाचे नेत्रदीपक परिणाम देतो. थोडक्यात Input + Processing = Output.
Input म्हणजे प्रक्रिया न केलेली माहिती (कच्ची माहिती) ज्यास संगणकीय भाषेत डेटा (data) म्हणतात. संगणकाच्या कार्यपद्धतीत डेटा स्वीकारणे, त्यावर आपल्या अपेक्षेप्रमाणे लॉजिकल प्रक्रिया करणे. तो साठविणे, आपल्याला पुनः पाहिजे तेव्हा तो उपलब्ध करून देणे अथवा छपाई करून देणे. संगणक प्रत्येक वापरकर्त्याला पाहिजे ते काम सहजपणे देतो. म्हणून काही लोक त्याला मॅजिक बॉक्स म्हणतात. असे असले तरी त्याची एक मर्यादा आहे कि हे मुकबधीर(dumb machine) मशीन आहे. म्हणून त्याला प्रत्येक सूचना(instruction) योग्यपद्धतीने दिली गेली पाहिजे जेणे करून त्याला त्यावर अचूक प्रक्रिया करता यावी.
Comments
Post a Comment