प्रस्तावना -

जगातील सर्वच देशात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. याला आपला देशही अपवाद नाही. संगणकाचा जास्त प्रमाणात वापर करणाऱ्या काही अग्र देशांमध्ये भारताचा क्रम लागतो. आज भारतामध्ये 3९% लोक संगणक साक्षर आहे. मला खात्री आहे येणाऱ्या काळात हि संख्या वाढत जाऊन सर्वाना संगणक साक्षर व्हावेच लागेल. आज मोठ्या उद्योगसमूहापासून सर्वसाधारण व्यवसायामध्ये संगणक मोठ्या प्रमाणात वापरला जातो. परंतु केवळ व्यावसायिक कामांसाठीच न राहता काही वर्षांमध्ये हा प्रत्येक घरामध्ये वापरला जाईल. पूर्वी पोस्टमनद्वारे येणारी पत्रं अनेक दिवस- महिन्याने आपल्याला मिळत. आता ती सेकंदाच्या काही भागात ई-मेलच्या इनबॉक्स मध्ये येतात. आज बँकिंग, बिलिंग, बुकिंग, रिझर्वेशन, घरगुती, शैक्षणिक, वैधकीय, साहित्यिक अशी अनेक कामे संगणकाद्वारे होत आहे. म्हणून संगणकाचे शिक्षण केवळ विधार्थ्यांनाच नव्हे तर सर्वानाच आवश्यक झाले आहे व काही दिवसात ते अनिवार्य होईल यात शंका नाही.

यश कंप्युटर हि संगणक प्रशिक्षण संस्था दर्जेदार संगणक प्रशिक्षणाबद्दल परिसरात परिचित आहे. काळानुसार वेगवेगळी अध्यापन प्रणाली राबवून विध्यार्थ्यांच्या आकलन शक्तीनुसार संगणक प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. यासाठी हजारो पालक, शिक्षक आणि विधार्थ्यांकडून मिळणारा निस्वार्थी प्रतिसाद आमचा उत्साह वाढवीत असतो. सन २००२ साली स्थापन केलेल्या आमच्या संस्थेत प्रशिक्षण घेऊन अनेक विधार्थी देशांत, राज्यात, जिल्हा व परिसरातील निरनिराळ्या विभागामध्ये यशस्वी काम करत आहेत. त्यांच्या यशातच यश कॉम्पुटरचे यश सामावलेले आहे.  

संगणकाचे शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी भाषा येणे अवश्यक आहे हा चुकीचा समज आहे. कारण संगणकाला इंग्रजी भाषा समजत नाही. मुळात त्याला कोणतीच भाषा समजत नाही. तो यंत्रभाषेनुसार काम करतो. यंत्रभाषेनंतर संगणकाला समजणारी दुसरी भाषा जोडभाषा. याप्रमाणे मानवाला न समजणारी भाषा यंत्रभाषा आणि सहजपणे समजणारी भाषा म्हणजे मातृभाषा. मातृभाषेत घेतलेले शिक्षण मानवाला चांगल्या रीतीने कळते आणि दीर्घकाळ त्याच्या लक्षात राहते. म्हणून संगणकाचे शिक्षण मराठी भाषेत उपलब्ध करून त्याचे लिखित स्वरूप आपल्यासमोर मांडताना मला विशेष आनंद होत आहे. 

धन्यवाद. 
चेतन गरगडे, 
संचालक: यश कंप्युटर्स. पिंपळगाव बसवंत, नाशिक.   
 


Comments