संगणकाचे गुणधर्म -(Characteristics of Computer)

Speed गति-  संगणक अतिजलद गतिने काम करतो. जे काम आपणास काही आठवडे करावे लागेल, ते काम संगणक काही सेकंदात करू शकतो. समजा आपणांस एक हजार कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्नाची सरासरी काढायची आहे. तर त्या लोकांच्या रोजच्या उत्पन्नाची माध्यमे शोधावी लागतील त्यातील नोंदी घेऊन मग प्रत्येकाची सरासरी काढावी लागेल. तर विचार करा यासाठी तुम्हाला किती वेळ काम करावे लागेल. थकवा, अप्रसन्नता या गोष्टींचाही तुमच्या कामातील गतिवर परिणाम होईल. हे काम तुम्हाला काही आठवडे, महिने करावे लागेल. पण तेच काम संगणक काही मिनिटात करून देईल. इंटनेटच्या माध्यमातून दर तासाला हवामानाचा अंदाज आपणास मिळतो. पण ते वातावरणातील तपमान, आद्रता, दबाव इ. गोष्टींचे मोठ्या प्रमाणावर संगणकीय विश्लेषण असते. ते संगणक काही मिनिटात करून देतो. असे अनेक दाखले देता येतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल कि एक मिलियन (दहा लाख) सूचनांवर एक साधा संगणक मिलिसेकंदात प्रक्रिया करू शकतो. अतिजलद गति हे संगणकाचे पहिले वैशिष्ट्ये आहे कि जे जगात या मशीन शिवाय दुसरे कोणत्याच मशीनकडे नाही. 

Accuracy अचूकता - समजा कोणीतरी खूप स्पीडने काम करतो आहे. परंतू त्यामध्ये चुका करतो तर ते काम व्यर्थ असते. काम किती केले. किती जलद केले याप्रमाणेच ते किती अचूक केले हे सुध्दा महत्वाचे आहे. अचूकता हे संगणकाचे संगणकाचे दुसरे महत्वाचे गुणवैशिष्ट्ये आहे. संगणकाची अचूकतेची क्षमता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. चुकतो ते केवळ चुकीच्या डेटा व वापरकर्त्याच्या चुकीच्या वापरामुळे.  

Diligence काळजी- Conscientiousness in paying attention to a task; giving the degree if care required in a given situation.  संगणक हे मशीन असल्यामुळे ते थकता अविरत काम करू शकते. यामध्ये प्रोग्रामिंग करताना मशीनने घ्यावयाची काळजी तसेच वर म्हटल्याप्रमाणे त्याची टास्कवर योग्य एकाग्रता असते. त्यावेळेला तो तेच काम करतो. यामुळे चुकीच्या आऊटपुटची ची संभावना फार कमी असते. 

Versatility(Multitasking)- कामातील विविधता याचाच अर्थ त्याची (एकाचवेळी) वेगवेगळ्या स्वरूपाची कामे करण्याची क्षमता. तुम्ही त्याचेकडून गणितीय कामे, त्यावेळी टायपिंग, इंटरनेटवर माहिती शोधणे, गाणे ऐकणे, व्हिडीओ पाहणे, अशी विविध कामे करून घेऊ शकता. 

Power of Remembering Data(दीर्घकाळ माहिती साठवून ठेवण्याची क्षमता) - संगणकाकडे खूप मोठया प्रमाणात व खूप काळ माहिती साठवण्याची क्षमता आहे. तुम्ही ती माहिती कित्येक वर्षानंतर आहे त्याच प्रकारात मिळवू शकता. तसेच मीहितीबद्दल गोपनीयता ठेवू शकता. 

No IQ संगणकाला स्वतःची बुद्धी नसते. आपण जे काम देतो, ज्या पद्धतीने देतो, तो त्याच पद्धतीने म्हणजे त्या सूचनांप्रमाणेच काम करतो. म्हणून संगणक स्वतःहून काहीही करत नाही. 

No Feeling- संगणकाला मन नाही, भावना नाही, चव नसते, ज्ञान नसते, ना अनुभव असतो. म्हणून तो थकत नाही. थांबत नाही. मानवाप्रमाणे त्याला मानसिक ताणतणाव त्याला येत नाही. त्यामुळेच त्याच्या कामात अचूकता असते. 

Storage- संगणकाकडे स्वस्थापित स्मरणिका असते. ज्यावर तुम्ही मोठ्या प्रमाणावर माहिती साठवू शकता. त्याप्रमाणे इतर बाह्य साठवणीचे उपकरणे (External Storage Devices) जोडून माहिती साठवू शकता. 


संगणकाचा इतिहास  History of Computer- 

संगणकाच्या इतिहासाबद्दल अभ्यास करता असे लक्षात येते कि अनेक तज्ञांनी या मशीन निर्मिती साठी खूप मेहनत घेतलेली आहे. यामध्ये गणिततज्ञ अग्रस्थानी आहे. संगणक निर्मितीसाठी जगातील अनेक संख्याशाश्त्राचा विचार करून त्यावर अभ्यास झालेला आहे. त्यामध्ये Babylonian system of numeration, Greek system of numeration, Roman system of numeration Indian system of numeration यापैकी भारतीय पद्धत जगात जास्त स्वीकारली गेली. जी आजच्या मूलभूत दशमान (0,1,2,3,4,5,6,7,8,9) पद्धतीवर अवलंबून आहे. तुमच्या असे लक्षात येईल कि संगणक कश्याप्रकारे या दशमान पद्धतीवर कॅल्क्युलेशन करतो परंतु आश्चर्य वाटेल का संगणकाला दशमान पद्धत कळत नाही. तर तो द्विमान पद्धतीनुसार काम करतो. 

काळानुसार संगणकीय उपकरणे कशा प्रकारे बदलत गेले त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. 

Calculation Machine(Abacus)- आज गणितीय कामांसाठी अनेक मशीन जरी उपलब्ध असली तरी इजिप्त व चीन मध्ये वापरले जाणारे दोन हजार वर्षापूर्वीचे जगातील पहिले गणितीय उपकरण म्हणजे Abacus. अबॅकस म्हणजे गणितीय तक्ता . ज्यामध्ये उभ्या रेषेत काठ्यांचा वापर करून त्यामध्ये पेबल्स चा संच ओवलेला असे. त्यावर त्या काळी लोक दहा, शंभराच्या पटीत युनिट मांडत असे. 

Napier's Bones- 1617 मध्ये जॉन नेपिअरने गणितीय कामांसाठी एक माचीच्या तयार केले जे नॅपियर्स बोन्स नावाने ओळखले जाते. त्याकाळी हे प्रसिद्ध मशीन होते. अनेक लोक त्याचा वापर करत असे. 

Slide Rule- सोळाव्या शतकात युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे स्लाइड रुल हे इंग्लिश गणिततज्ञ Edmund गुंटर याने निर्माण केले होते. जे बेरीज वजाबाकी, भागाकार, करू शकणारे पहिले मशीन होते. 

Pascal's Adding and Subtracting Machine- वयाच्या एकोणविसाव्या वर्षी ब्लेझ पास्कलने सक्षम पद्धतीने बेरीज वजाबाकी करू शकणारे मशीन तयार केले. या माचीनमध्ये बसविलेले होते. 

Leibniz's Multiplication and Dividing Machine- हे यंत्र जर्मन तत्वज्ञानी व गणिततज्ञ ने मध्ये तयार केले जे उत्तमप्रकारे गुणाकार भागाकार करू शकत होते. 

Babbage's Analytical Engine- 1823- मध्ये इंग्लिश गणिततज्ञ चार्ल्स बॅबेजने गुंतागुंतीच्या कामांसाठी Difference Engine हे मॅकेनिकल पद्धतीचे मशीन तयार केले. तसेच काही वर्षानंतर त्याने पुन्हा सर्व साधारण कामांसाठी Analytical Engine तयार केले. आजच आधुनिक संगणक बॅबेजच्या प्रबंधानुसार तयार झालेला आहे. त्यामुळे सर चार्ल्स बॅबेजला संगणकाचा जनक मानले जाते. 

Comments