Posts

 संगणकाचे गुणधर्म -(Characteristics of Computer) Speed गति-  संगणक अतिजलद गतिने काम करतो. जे काम आपणास काही आठवडे करावे लागेल, ते काम संगणक काही सेकंदात करू शकतो. समजा आपणांस एक हजार कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्नाची सरासरी काढायची आहे. तर त्या लोकांच्या रोजच्या उत्पन्नाची माध्यमे शोधावी लागतील त्यातील नोंदी घेऊन मग प्रत्येकाची सरासरी काढावी लागेल. तर विचार करा यासाठी तुम्हाला किती वेळ काम करावे लागेल. थकवा, अप्रसन्नता या गोष्टींचाही तुमच्या कामातील गतिवर परिणाम होईल. हे काम तुम्हाला काही आठवडे, महिने करावे लागेल. पण तेच काम संगणक काही मिनिटात करून देईल. इंटनेटच्या माध्यमातून दर तासाला हवामानाचा अंदाज आपणास मिळतो. पण ते वातावरणातील तपमान, आद्रता, दबाव इ. गोष्टींचे मोठ्या प्रमाणावर संगणकीय विश्लेषण असते. ते संगणक काही मिनिटात करून देतो. असे अनेक दाखले देता येतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल कि एक मिलियन (दहा लाख) सूचनांवर एक साधा संगणक मिलिसेकंदात प्रक्रिया करू शकतो. अतिजलद गति हे संगणकाचे पहिले वैशिष्ट्ये आहे कि जे जगात या मशीन शिवाय दुसरे कोणत्याच मशीनकडे नाही.  Accuracy अचूकता - समजा कोणीतर
संगणकाची ओळख-  Computer या Compute इंग्रजी क्रियापदापासून तयार झालेला शब्द आहे. Compute म्हणजे हिशोब करणे. मानवाच्या व्यावहारिक जीवनामध्ये हिशोब / गणितीय कामे अटळ आहे. यासाठी आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा काही गणितीय सूत्र वापरतो. यामुळे कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने हिशोब करता येतो. परंतु गुंतागुंतीची कामांसाठी जास्त वेळ लागतो आणि अचूकतेचा प्रश्न निर्माण होतो. कदाचित म्हणूनच मानवाला अशा गुंतागुंतीच्या कामांसाठी आणि त्यातील अचूकतेसाठी मशिन निर्माण करण्याची कल्पना सुचली. या संकल्पनेतून ज्या मशीनचा किंवा उपकरणांचा जन्म झाला. त्यास आपण कंप्युटर म्हणतो. मराठीत या मशीनला संगणक म्हणतात. संगणक म्हणजे गणितीय कामे करणारा. असे असले तरी हा केवळ गणितीय कामेच करू शकतो किंवा केवळ हिशोबासाठीच वापरला जातो असे नसून जगातील सर्वच क्षेत्रामध्ये संगणकाने आपला ठसा उमटविला आहे. विशेषतः संशोधनासारख्या क्षेत्रामध्ये संगणक अतिमहत्वाची भूमिका पार पडतो. आज आपण वापरतो तो संगणक पूर्वीच्या संगणकाच्या तुलनेत उपकरणांनी वेगळा वाटतो  पण  एकूण कामाच्या माध्यमात थोडा फरक आहे. दरम्यानच्या काळात अनेक नवनवीन आवृत्ती निर्
प्रस्तावना - जगातील सर्वच देशात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. याला आपला देशही अपवाद नाही. संगणकाचा जास्त प्रमाणात वापर करणाऱ्या काही अग्र देशांमध्ये भारताचा क्रम लागतो. आज भारतामध्ये 3९% लोक संगणक साक्षर आहे. मला खात्री आहे येणाऱ्या काळात हि संख्या वाढत जाऊन सर्वाना संगणक साक्षर व्हावेच लागेल. आज मोठ्या उद्योगसमूहापासून सर्वसाधारण व्यवसायामध्ये संगणक मोठ्या प्रमाणात वापरला जातो. परंतु केवळ व्यावसायिक कामांसाठीच न राहता काही वर्षांमध्ये हा प्रत्येक घरामध्ये वापरला जाईल. पूर्वी पोस्टमनद्वारे येणारी पत्रं अनेक दिवस- महिन्याने आपल्याला मिळत. आता ती सेकंदाच्या काही भागात  ई-मेलच्या  इनबॉक्स मध्ये येतात. आज बँकिंग, बिलिंग, बुकिंग, रिझर्वेशन, घरगुती, शैक्षणिक, वैधकीय, साहित्यिक अशी अनेक कामे संगणकाद्वारे होत आहे. म्हणून संगणकाचे शिक्षण केवळ विधार्थ्यांनाच नव्हे तर सर्वानाच आवश्यक झाले आहे व काही दिवसात ते अनिवार्य होईल यात शंका नाही. यश कंप्युटर हि संगणक प्रशिक्षण संस्था दर्जेदार संगणक प्रशिक्षणाबद्दल परिसरात परिचित आहे. काळानुसार वेगवेगळी अध्यापन प्रणाली राबवून विध्यार्थ्यांच्या आकल